
महिंद्राने अखेर ‘एक्सयुव्ही 400’ इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, देशात ‘महिंद्रा एक्सयूव्ही ४००’ च्या ४०० यूनिट्सची डिलिव्हरी सुरू करण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक कारची टक्कर देशात सर्वात जास्त विकली जाणारी इलेक्ट्रिक कार ‘टाटा नेक्सॉन इव्ही’ शी होणार आहे. सध्या महिंद्राने नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या टॉप-स्पेक इएल व्हेरियंटची डिलिव्हरी सुरू केली आहे. त्यामुळे असे मानले जात आहे की, बाकीच्या व्हेरियंट्सची डिलिव्हरी ऑक्टोबरदरम्यान सुरू केली जाणार आहे.
‘एक्सयूव्ही ४००’ चारचाकीने तीन व्हेरियंट सोबत आणले आहेत. यात दोन बॅटरी पॅक ऑप्शन मिळतील. या बॅटरी पॅकमध्ये 34.5 केडब्ल्यूएच आणि 39.4 केडब्ल्यूएच ऑप्शनचा समावेश आहे.

कंपनीचा दावा आहे की, इलेक्ट्रिक एसयूव्ही फक्त ८.३ सेकंदात १०० किमी प्रति तासचा वेग पकडू शकते. रेंजमध्ये ही कार फुल चार्ज झाल्यानंतर ४५६ किमी. पर्यंत धावू शकते. परंतु, याची छोटी बॅटरी पॅक एकदा फुल चार्ज झाल्यानंतर ३७५ किमीचे अंतर पार करेल. डीसी फास्ट चार्जरने महिंद्रा एक्सयूवी 400 ला ५० मिनिटात चार्ज करता येवू शकते. तर 7.2 केडब्लू एसी चार्जरने ही इलेक्ट्रिक एसयूव्ही चार्ज होण्यास ६ तासांहून जास्त वेळ लागतो. भारतात ‘महिंद्रा एक्सयूवी 400’ च्या इसी व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत १५.९९ लाख रुपये आहे. परंतु, ७.२ केएच चार्जरसोबत ईसी व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत १६.४९ लाख रुपये आहे.
शेवटच्या टॉप-स्पेक महिंद्रा एक्सयूवी 400 च्या इ एल व्हेरियंटची किंमत १८.९९ लाख रुपये आहे.