सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • उद्योग/
  • मेणबत्ती व्यवसाय

मेणबत्ती व्यवसाय

by सह्याद्री मराठी वृत्त 31 March 2023 0 Comments
31Mar, 2023

मेणबत्ती व्यवसाय हा कमी खर्चात करता येऊ शकणारा व चांगली आर्थिक कमाई करून देणारा आहे. मेणबत्तीचा वापर अलीकडे वाढला आहे. ख्रिस्ती धर्मात तर मेणबत्तीला महत्त्वाचे स्थान आहे. दिवाळीत काही मराठी कुटुंबेही मेणबत्त्यांनी घर सजवताना दिसतात. जत्रांमध्ये मेणबत्त्यांची आरास केलेली दिसते. मेणबत्ती व्यवसाय करण्यासाठी मेणबत्ती धागा रिळ, एरंडेल तेल, पॅराफिन मेण, थर्मामीटर, ओव्हन, सुवासिक वासासाठी अत्तर, विविध रंग आणि यंत्रसामग्री वापरली जाते.

मेणबत्ती तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत. पहिली म्हणजे पारंपरिक पद्धत अर्थात मेणबत्ती प्रक्रिया हाताने करणे ही होय. दुसरी म्हणजे अर्ध स्वयंचलित यंत्र किंवा पूर्णतः स्वयंचलित यंत्राद्वारे मेणबत्त्या बनविल्या जातात. यंत्राद्वारे मेणबत्ती बनविण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. हाताने मेणबत्ती तयार करण्यासाठी सुरुवातीला उष्णता देऊन मेण वितळवावे लागते. त्यानंतर मेणबत्ती ज्या आकाराची मेणबत्ती बनवायची आहे, त्या साच्यात गरम मेण ओतून ते थंड होईपर्यंत थांबावे लागते. थंड झाल्यानंतर ते मेण मेणबत्तीचा आकार घेते. मोठ्या आकाराच्या सुईने मेणाच्या मधोमध धागा घातला जातो; आणि पुन्हा गरम मेण टाकून ते एकजीव केले जाते. अशा प्रकारे तयार झालेली मेणबत्ती वेष्टनबंद करून विक्रीस जाते.

हा व्यवसाय करण्यासाठी निश्चित जागा हवी. तो मोठीच हवी असे नाही. व्यवसायासाठी जागा निवडताना हवेशीर खोली बघावी. तिथे मेण वितळवण्यासाठी पर्याप्त जागा असावी. त्याचबरोबर मेणबत्ती व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल व तयार केलेल्या मेणबत्ती त्या खोलीत ठेवण्यासाठी पुरेशी जागा असावी. स्वयंचलित यंत्राद्वारे मेणबत्ती बनवत असाल तर साधारणपणे तासाला १००० ते १२०० मेणबत्त्या बनविता येतात. हेच काम जर हाताने करत असाल तर सर्वसाधारणपणे एक व्यक्ती दिवसाला ८० ते १०० मेणबत्त्या अगदी सहज तयार करू शकतो.

यंत्राचा विचार करीत असल्यास उत्पादन क्षमतेनुसार रु.३०,००० पासून रु.३ लाख ५० हजारपर्यंत विविध यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. सर्वसाधारणपणे ३ प्रकारची यंत्रे मिळतात. मॅन्यूअल यंत्र हाताळणे सोपे असून ताशी १००० पर्यंत मेणबत्ती याद्वारे बनवू शकता. या यंत्रामध्ये कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले नसून बऱ्याचशा गोष्टी स्वतःला कराव्या लागतात. अर्ध स्वयंचलित यंत्राने मॅन्यूअलच्या तुलनेत जास्त जलद आणि चांगले काम करता येते. पूर्ण स्वयंचलित यंत्राने विविध आकाराच्या मेणबत्त्या बनविता येतात. वाढदिवसाची मेणबत्ती गोलाकार, आयताकार, चौकोनी कशीही करू शकता.

मेणबत्ती विक्रीसाठी पाठविताना ती छानपैकी वेष्टनबंद करावी लागते. सर्वसाधारण पणे मेणबत्तीच्या आकाराचा ‘कार्डशीट’ कागदाचे छोटे खोके तयार करून घेतला जातो. मेणबत्ती प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून त्या खोक्यांमध्ये बंद केली जाते. खोक्यावर कंपनीचे नाव व इतर माहिती असलेले लहानसे आकर्षक पत्रक लावले जाते.

Next
गूळ प्रक्रिया उद्योग
March 31, 2023
Previous
विषमुक्त आहारासाठी नैसर्गिक शेती
March 30, 2023
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to मेणबत्ती व्यवसाय?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !