सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • शेती/
  • वांगी

वांगी

by सह्याद्री मराठी वृत्त 31 March 2023 0 Comments
31Mar, 2023

भारतीय खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली वांगी लोकप्रिय भाजीपाल्यातील एक पीक आहे. वांगी प्रामुख्याने गोल, लांब-सडपातळ व ठेंगणी, जाड आणि मोठी अशा विविध प्रकारात आढळतात. आयुर्वेदात वांगे हे मधुमेह, रक्तदाब आणि वजन कमी करण्यासाठी गुणकारी असल्याचे मानले जाते.

लोकसंगीत, म्हणी, वाक्प्रचारातसुद्धा वांगी  आढळतात. भारतात सुमारे ५.५ लाख हेक्टर जमिनीत वांग्याचे पीक घेतले जाते. चीननंतर भारत हा सर्वात मोठा वांगी उत्पादक देश आहे.

कोरड्या आणि उष्ण हवामानामध्ये वांग्याची वाढ चांगली होते. ढगाळ हवामान व एकसारखा पाऊस वांगी पिकाला मानवत नाही. सरासरी 13 ते 21 सेल्सिअस तापमानाला वांग्याचे पीक चांगले येते. सर्व प्रकारच्या हलक्या ते भारी जमिनीत वांग्याेचे पीक घेता येते; परंतु सुपीक चांगला पाण्याेचा निचरा होणाऱ्या मध्यम काळ्या जमिनीमध्ये  वांग्याचे झाड जोमाने वाढते. वांग्याची लागवड तीनही हंगामात करता येते.

जगातील एकूण उत्पादनापैकी २.६ टक्के वांगी भारतात होतात. देशात सर्व प्रांतात वांगी पिकवली जातात. हिरव्या व जांभळ्या रंगाची वांगी भाजीमंडईत मुबलक प्रमाणात असतात.

वांग्यामध्ये प्रामुख्याने काळी व पांढरी असे दोन प्रकार आहेत. काळी वांगी अधिक गुणकारी असतात. जेवढी कोवळी तेवढी ती अधिक गुणयुक्त व शक्तिवर्धक मानली जातात. कफ प्रकृतीच्या व समप्रकृतीच्या लोकांनीही हिवाळ्यात वांग्याचे सेवन करणे, गुणकारी ठरते. लहान कोवळे वांगे कफ व पित्तनाशक असते.

वांगी या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर खरीप, रब्बी  हंगामात आणि उन्हाळ्यातही करता येते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्र पीक म्हणूनही वांग्याची लागवड करतात. आहारात  भाजी, भरीत, भजी, भात इत्यादी अनेक प्रकारे वांग्याचा उपयोग होतो. वांग्याीमध्ये खनिजे, जीवनसत्वे तसेच लोह, प्रथिने यांचे प्रमाण पुरेसे असते. मांजरी , गोटा, वैशाली, प्रगती, अरूणा या काही वांग्याच्या जाती आहेत. रोप लावणीनंतर 10 ते 12 आठवड्यांनी फळे तयार होतात. फळे पूर्ण वाढून टवटवीत आणि चकचकीत असतानाच काढणी करावी. फार कोवळी फळे काढल्यास उत्पादनात घट येते. तसेच जून फळे  गिऱ्हाईकांच्या पसंतीस उतरत नाहीत. 4 ते 5 दिवसांच्या अंतराने 10 ते 12 वेळा वांग्याची तोडणी करता येते. वांग्याची काढणी साधारणपणे तीन ते साडेतीन महिने चालू राहते.

वांगी पिकाचे सरासरी हेक्टरी उत्पादन 100 ते 250 क्विंटलपर्यंत मिळते.

कोवळी वांगी विस्तवावर भाजून मधात कालवून संध्याकाळी चाटून खाल्ल्याने झोप चांगली येते. वांग्याची भाजी खाल्ल्याने लघवीचे प्रमाण वाढते व मूत्रमार्गातील मुतखडा विरघळून जाण्यासाठी मदत होते.

Next
ओझरचा श्री विघ्नहर
March 31, 2023
Previous
गूळ प्रक्रिया उद्योग
March 31, 2023
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to वांगी?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !