घारापुरी लेणी

महाराष्ट्रातील मुंबईपासून ६ ते ७ मैलावर असलेली घारापुरीची लेणी ही ‘एलिफंटा लेणी’ म्हणूनही ओळखली जातात. घारापुरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे मोठ्या आकाराचे एक शिल्प होते, त्यावरूनच या लेण्यांना ‘एलिफंटा लेणी’ असे नाव पडले. समुद्रातील ‘घारापुरी’ या लहानशा बेटावरील डोंगरात ही लेणी असून भव्य आकाराच्या शिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. ही पाषाणात खोदलेली आहेत.  या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसास्थानाचा दर्जा दिला आहे.

या लेण्यांच्या निर्मितीचा काळ साधारण इसवी सन ९०० ते १३०० च्या दरम्यान असावा, असा अंदाज आहे. आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतकी अप्रतिम कलाकृती निर्माण कली, हे आश्चर्यकारकच आहे.

‘घारापुरी’ बेटावर पोहोचण्यासाठी मुंबई शहरातील ‘गेट वे ऑफ इंडिया’ कडून होडीने जावे लागते. होडीचा हा प्रवास साधारण तासाभराचा आहे. या सागरी प्रवासात पक्षी-बगळ्यांबरोबरच मुंबईचे दुरून दिसणारे रूपही डोळ्यात साठवून घेता येते. याशिवाय समुद्रातून उत्खनन करून पेट्रोलियम मिळविणारे ‘बॉम्बे हाय’क्षेत्र, न्हावा-शेवा बंदर हेसुद्धा पाहता येते.

या गावाचे प्राचीन नाव ‘श्रीपुरी’ असे होते. कोकणातील मौर्य वंशाची ‘घारापुरी’ ही राजधानी असावी. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी शिव-पार्वती विवाह,गंगावतरण,तांडवनृत्य,अंधकासुर वध इ. दृश्ये अतिशय मनोहर आहेत. महाकाय गुहा, त्रिमुखी मूर्ती आकर्षक आहे. ती  साक्षात शिवाचे जीवनच साकार करतात. भारतातील प्राचीन समृद्धीचे दर्शन घडविणारी ही घारापुरी लेणी आपण पहायलाच हवीत !

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *