अजय देवगणचा भोला

अजय देवगणचा ‘भोला’ चित्रपट ३० मार्चला प्रदर्शित झाला; मात्र रामनवमीचा सुट्टीचा दिवस असूनही या चित्रपटाची सुरुवात काही शानदार झालेली दिसली नाही. चित्रपटगृहातील अनेक खुर्च्या सकाळच्या ‘शो’ वेळी रिकामीच दिसून आल्या. अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. अजयच्या या बहुचर्चित चित्रपटाची नोंदणीही म्हणावी तितकी चांगली झाली नव्हती. मात्र एकंदरित ‘भोला’ची पहिल्याच दिवशी ‘बॉक्स ऑफिस’वर निराशा झाली असल्याचे एकंदर चित्र आहे.

देशभरातील ४००० पडद्यांवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. तामिळ सिनेमा ‘कैथी’चा रिमेक असणारा ‘भोला’ हा चित्रपट अभिनेता अजय देवगणनेच दिग्दर्शित केला आहे. सिनेमातील दृश्य चित्रीकरणावरही जबरदस्त मेहनत घेण्यात आली आहे.

रामनवमीदिवशी सुट्टी असल्याने ‘भोला’ चांगली कमाई करेल, या अपेक्षेवर पाणी फिरले. उत्तरप्रदेश, राजस्थान व मध्यप्रदेश या राज्यांमध्येही सुरुवात चांगली झाली नाही. शनिवार-रविवारी सिनेमाची कमाई वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जरी सुरुवात मंद असली तरी येत्या दोन-तीन दिवसात भोला किती कमाई करेल, याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *