अजमेर फाइल्स

राजस्थानमधील अजमेरमध्ये इ. स. १९९२ मध्ये जवळपास ३०० मुलींचे ‘न्यूड’ छायाचित्रे प्रसारित झाली होती. त्यानंतर राज्याबरोबरच देशातही प्रचंड खळबळ झाली. अजमेरमधील प्रतिष्ठित कुटुंबातील आरोपी तरुण असल्याने हे प्रकरण दाबले गेले. माध्यमांच्या हवाल्यानुसार, एका महाविद्यालयीन तरुणीपासून सुरू झालेल्या या प्रकरणात नंतर सुमारे ३०० मुलींना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात आले होते. हे सांगण्याचे कारण म्हणजे, या विषयावर आता ‘अजमेर फाइल्स’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या प्रकरणामुळे तत्कालीन राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचेही पद डळमळीत झाले होते. या घोटाळ्यात सहभागी असलेले लोक प्रतिष्ठित कुटुंबातील होते. त्यामुळे हे प्रकरण अतिशय भयानक बनले होते. बऱ्याच वर्षांनंतर त्यावर निघणाऱ्या वेबसीरिजमुळे पुन्हा हे प्रकरण चर्चेत आले आहे. आजही या प्रकरणातील सगळ्या आरोपींना पकडण्यात यश आलेले नाही. आता या घटनेवर आधारित ‘अजमेर फाइल्स’ ही वेबसीरिज या प्रकरणावर कितपत प्रकाश टाकते हे पाहणे सर्वांच्याच औत्सुक्याचे ठरणार आहे.

या वेबसीरिजचे दिग्दर्शन अभिषेक दुधैया करणार असून यावर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये ही सीरिज प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. अभिषेक टिप्स कंपनीच्या सहकार्याने याची निर्मिती होत आहे. नुकतीच त्यांनी याबद्दल समाजमाध्यामांच्या व्यासपीठावरून अधिकृत घोषणा केली आहे. अभिषेक दुधैया यांनी यापूर्वी ‘भुज– द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये अभिषेक यांनी अजय देवगण आणि संजय दत्त यांच्यासोबत काम केले आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *