Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

बाप-लेकीचे गोड नाते

बाप-लेकीचे नाते फार गोड असते. वडील हे मुलींसमोरील आदर्श असतात. वडील म्हणजे आपली सुरक्षा, विश्वास आणि प्रेम असल्याचे त्यांच्या मनानेच ठरविलेले असते. जेव्हा वडील मुलीच्या शिक्षणात, मुलीच्या कोणत्याही गोष्टीत रस घेतात तेव्हा तिचा विश्वास दुणावतो. करिअरच्या बाबतीतही वडिलांची साथ मिळाल्यास मुलींना प्रगती करणे शक्य होते. प्रेमळ वडील मुलीला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देतात.

मुलगी वयात येत असताना वडील आणि मुलीमध्ये लहानसहान गोष्टींवरून वादविवाद निर्माण होऊन दुरावा येण्याची शक्यता असते. अशा वेळी वडिलांनी संवाद साधणे आणि मुलीला विश्वासात घेऊन तिला योग्य निर्णय घेण्यास मदत करणे गरजेचे असते. याच वयात मुलीस लाभणाऱ्या संगतीबाबत वडिलांनी जागरूक असायला हवे. मुलीला तिच्या आयुष्यात महत्त्व देणारे कोणीतरी आहे, याची जाणीव वडिलांचे नाते करून देत असते. अशा मुली वागण्यात आणि संवादाच्या बाबतीही आत्मविश्वास असणाऱ्या असतात.

ज्या मुलीचे वडिलांसोबतचे नाते खेळकर असते, त्यांना आयुष्यातील समस्या सोडविताना कोणताही त्रास होत नाही. त्यांच्यात भीती आणि एखाद्या समस्येला टाळण्याची वृत्ती कमी असते. मुलीच्या मानसिक आणि भावनिक विकासात आईप्रमाणेच बाबांचाही तेवढाच वाटा असतो. लग्न ठरताना किंवा करिअर निवडताना तिला आईसोबत वडिलांचीही सगळ्यात जास्त गरज असते. मुलीचे लग्न ठरविताना वडिलांची भूमिका सर्वात जास्त महत्त्वाची असते. चांगल्या नात्यांमुळे मुले नेहमीच प्रगतशील बनतात. आपल्या मुलीला योग्य जोडीदार निवडण्यासाठी मदत करणे किंवा त्याबाबत योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे असते.

आईवडिलांचे नाते खेळकर, सामंजस्याचे असेल तर मुलीचे वैवाहीक जीवनही चांगला आकार घेते. घटस्फोट किंवा आईवडिलांमधील दुरावा यामुळे नकळतपणे मुले पालकांपासून दूर जाऊ शकतात. वडिलांशिवाय मुली कमी आत्मविश्वास असणाऱ्या, स्वतःचे महत्त्व न समजणाऱ्या आणि अबोल होतात. आपल्या लाडक्या लेकीला सासरी पाठविताना वडीलांनाही फार त्रास होत असतो.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *