Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

ठरलं तर मग अव्वल मालिका

छोट्या पडद्यावरील मराठी मालिका घराघरात आवडीने पहिल्या जातात. नुकत्याच सुरू झालेल्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेने इतर सर्व मालिकांना मागे टाकले आहे. या मालिकेने टीव्हीवर तर आपले वर्चस्व सिद्ध केलेच होते. आता ऑनलाइनवरही या मालिकेने अधिराज्य गाजविले आहे. 

टीव्हीवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या यादीत ‘ठरलं तर मग’ ही मालिका अव्वल होती.  आता ही मालिका मोबाइल ॲपवर सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका ठरली आहे.

यापूर्वी कित्येक महिने फक्त ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आपले अधिराज्य गाजवित होती. अनेक महिने या मालिकेचे रेकॉर्ड कुणीही मोडू शकले नव्हते. मात्र या आठवड्यात ‘ठरलं तर मग’ने तिला चांगलीच टक्कर दिली आहे.

‘आई कुठे काय करते’  मालिका चक्क दुसऱ्या क्रमांकावर गेली आहे. तिच्यानंतर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका आहे. दीपा आणि कार्तिक यांची ‘रंग माझा वेगळा चौथ्या क्रमांकावर असून  ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने पुन्हा एकदा वर झेप घेतली आहे.  

‘ठरलं तर मग’ ही मालिका  5 डिसेंबर 2022 पासून ‘स्टार प्रवाह’वर प्रसारित झाली. तमिळ टीव्ही मालिका ‘रोजा’चा हा अधिकृत रिमेक आहे. याचे दिग्दर्शन सचिन गोखले यांनी केले आहे. ‘सोहम प्रॉडक्शन’च्या बॅनरखाली आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *