
अल्लू-अर्जुनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपट क्षेत्रात प्रचंड धूम माजली होती. या चित्रपटाला जगभरात पसंती मिळाली. आता अल्लू-अर्जुनने जेव्हा ‘पुष्पा 2’ बाबत घोषणा केली, तेव्हा तर चाहत्यांचा आनंद द्विगुणित झालेला दिसत आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुष्पा-द रुल’चा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये पुष्पा घनदाट जंगल आणि निर्जन परिसरात दिसत असून सर्वांच्या नजरेतून दूर गेल्याचे टीझरमध्ये पहायला मिळत आहे. कुठे आहे, हे कोणालाच माहीत नाही; मात्र प्रत्येकाच्या मनात आशा आहे की पुष्पा जिवंत आहे. पुष्पा जिवंत असणे शत्रूंसाठी मोठा धोका असला तरीही रसिकांसाठी मोठे मनोरंजन आहे.

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी ‘पुष्पा’ चित्रपटाचे हे नवीन अपडेट देऊन चाहत्यांना खूप प्रभावित केले आहे. तरण आदर्शने या चित्रपटाच्या टीझरची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले – ”पुष्पा परत येत आहे.”
चाह्त्यांकडूनही या टीझरचे स्वागत होत आहे. कमेंट करताना एका व्यक्तीने लिहिले आहे- ‘पुष्पा 2′ बॉक्स ऑफिसवर लागलेली आग आहे !’