सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी
Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 124
सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • ठळक बातम्या/
  • सौंदर्य वाढविण्यासाठी काही सोपे घगूती उपाय ….   

सौंदर्य वाढविण्यासाठी काही सोपे घगूती उपाय ….   

by सह्याद्री मराठी वृत्त 17 September 2022 0 Comments
17Sep, 2022

आपल्या घरच्या वस्तूंपासून आपण आपल्या शरीराची काळजी घेऊ शकतो. घरगुतीच उपाय करून आपण आपल्या शरीराची काळजी घेऊ शकतो. बाजारातील रासायनीक असलेल्या वस्तू वापरण्यापेक्षा घरच्या वस्तू वापरल्या तर आपण आपल्या त्वचेची जास्ती काळजी घेऊ शकतो.

१. त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी आपण आठवड्यातून दोन / तीन वेळा आपण हा उपाय करू शकतो. बेसन, हळद आणि दूध मिक्स करून, त्यात साधे मीठ टाकावे  आणि कोणत्याही तेलाचे ५/७ थेंब टाकावे. मिश्रण एकजीव करून चेहऱ्याला व मानेला लावावे. पेस्ट वाळल्यानंतर १०-१५ मिनिटांनी काढून टाकावी.

२. डोळ्यांभोवती क्रीम लावताना ते डोळ्यात जाणार नाही, याची काळजी घ्यावी. क्रीमचा वापर साधारणपणे रात्री झोपताना करावा.

३. डोळ्यांखालची वर्तुळे घालविण्यासाठी चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती रात्री लावून ठेवावी. सकाळी धुऊन टाकावे. यामुळे डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.

४. सावळेपणा दूर करण्यासाठी आजकाल बाजारात अनेक प्रकारची क्रीम्स उपलब्ध आहेत. पण आपण जर घरच्या घरीच काही उपाय केले तर त्वचेचा सावळेपणा काही अंशी दूर होऊ शकतो. एक बादली पाण्यात एका लिंबाचा रस टाकावा. या पाण्याने स्नान करण्याने त्वचेची बंद रंध्रे खुलतात आणि त्वचा उजळते. हिवाळ्यात  हा प्रयोग करताना गरम पाणी घयावे आणि उन्हाळ्यात थंड पाणी घयावे. सावळेपणा दूर करण्यासाठी आवळा चूर्णात थोडं पाणी मिसळून ती पेस्ट चेहऱ्यावर व पूर्ण शरीरावर लावावी.

५. ओठांचे सौंदर्य राखण्यासाठी ओठ काळे पडले असतील तर दुधात मीठ मिसळून लावावे. काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवून टाकावे. ओठांवर पापडी जमा होत असेल तर लोण्यात केशर मिसळून ओठांना लावावे.

६. हातापायावरील व्रण, डाग घालविण्यासाठी लिंबाची साल त्यावर पाच ते सात मिनिटांसाठी चोळावी. हा उपाय दिवसातून दोनदा असा कमीत कमी सात दिवस तरी करावे. डाग कमी होतील.

७. चेहऱ्यावरील  सुरकुत्या घालविण्यासाठी  तोंडावर  सुरकुत्या पडल्या असतील तर आल्याचा रस कोमट करून तो रात्री झोपताना चेहऱ्यावर लावावा. सकाळी चेहरा स्वछ धुऊन खोबरेल तेल चोळावे. या उपायाने सुरकुत्या कमी होऊन त्वचा तेजस्वी होते.

८. कोमल त्वचेसाठी दोन चमचे दूध कींवा सायीमध्ये लिंबाचा रस पिळून त्याला तोंड आणि मानेवर थोडा वेळ लावावे, आणि थोड्या वेळाने धुऊन टाकावे. चेहऱ्याला ब्लिच केल्यासारखे वाटेल. त्यामुळे त्वचा कोमल आणि तजेलदार बनेल.

९. पुटकुळ्या घालविण्यासाठी कारल्याची  साल चेहऱ्यावर चोळावी. यामुळे पुटकुळ्या, काळी वर्तुळे, काळे डाग निघण्यास मदत होईल. हा उपाय साधरणतः तीन ते पाच दिवस करून पहावा.

१०. केसांमधील कोंडा घालविण्यासाठी आंबट दही केसांना लावावे. आंबट दही आंघोळीपूर्वी केसांना लावावे व साधारणपणे १५ ते २० मिनिटात केस धुवून टाकावे. तसेच आपण लिंबाचा रस केसाला लावला तर कोंड्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

Next
...तर तुम्ही महान नेते आहात - इंद्रा नूयी
September 17, 2022
Previous
स्त्रिया कशामुळे करतात पुरुषांना आकर्षित ?
September 17, 2022
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to सौंदर्य वाढविण्यासाठी काही सोपे घगूती उपाय ….   ?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !