Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

गुलाबाचे सरबत

गुलाबाचा मंद सुगंध मनमोहक असतो. या फुलांचा गुलकंद सर्वांच आवडतो. शीतपेय म्हणूनसुद्धा गुलाब फार उपयुक्त आहे. या उन्हाळ्यात गुलाबाच्या सरबताचा आस्वाद घेऊया.

साहित्य

१ किलो साखर, ४०० मिली.पाणी, अर्धा लहान चमचा सायट्रिक ॲसिड, पाव लहान चमचा रासबेरी रेड रंग, अर्धा चमचा रोझ इसेन्स,

कृती

प्रथम १ किलो साखरेमध्ये ४०० मिली. पाणी मिसळून त्यात अर्धा  चमचा सायट्रिक ॲसिड घालावे. सर्व एकत्र करून गॅसवर एक उकळी येईपर्यंत ठेवावे. गार झाल्यावर त्यात रंग व इसेन्स घालावा. गाळून बाटलीत भरावे. पिण्यासाठी सरबत देताना पाव भाग तयार केलेले द्रावण आणि पाऊण भाग पाणी किंवा दूध घालून छान मिसळून द्यावे. झाले आपले सरबत तयार !

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *