Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

द लास्ट किंगडम

‘द लास्ट किंगडम: सेव्हन किंग्स मस्ट डाय’ ही इंग्रजीमधील ब्रिटिश ऐतिहासिक वेबमालिका आज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. एडवर्ड बझालगेट यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले असून मार्था हिलियर यांनी या कथेचे लेखन केले आहे. त्यांच्या ‘द सॅक्सन’ या कथेवर आधारित ही मालिका आहे. संयुक्त इंग्लंडभोवती हे कथानक फिरते.

निर्माता निगेल मार्चंट यांनी सांगितले, ”सन 2022 च्या सुरुवातीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘द लास्ट किंगडम’च्या पाचव्या हंगामाच्या आधी लंडन ‘एमसीएम कॉमिक-कॉन’ येथे या मालिकेचा ‘फीचर लेन्थ सिक्वेल’ ड्रायमन यांनी घोषित केला होता. त्यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले. त्यावेळी याला ‘सेव्हन किंग्स मस्ट डाय’ असे कार्यरत शीर्षक देण्यात आले होते. इंग्लंडमधील तत्कालीन वायकिंग आक्रमणांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या सुमारे 45 वर्षांच्या इतिहासात घडलेल्या मालिकेतील घटनांचे ही मालिका अनुसरण करीत आहे.”

ही कथा संयुक्त इंग्लंडच्या कथानकाशी जुळते. किंग एडवर्ड (टीमोथी इनेस) हा मरण पावल्यानंतर मुकुटासाठी लढाई तीव्र होते. उथ्रेड (अलेक्झांडर ड्रेमन) ने इंग्लंडला एकत्र करण्यासाठी त्याच्या साथीदारांसह पुन्हा एकदा पाऊल उचलले पाहिजे, असे अपेक्षित असते. नेमके काय होते, हे पाहण्यासाठी ही मालिका बघायला हवी.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *