
‘रावरंभा’ ही ऐतिहासिक प्रेमकहाणी १२ मे ला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाविषयी उत्कंठा आहेच; मात्र सध्या चित्रपटातील गाण्यांचीच चर्चा समाजमाध्यमावर जास्त रंगत आहे.

‘साथ साथ’, ‘हां मर्दा’ अशी स्फुरण चढणारी गीते आणि ‘तुझ्या दावणीला’, ‘एक रंभा एक राव’ या प्रेमगीताचा नजराणा चित्रपटातील गीत-संगीतातून रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गीतांना आदर्श शिंदे, आनंदी जोशी, हर्षवर्धन वावरे, रवींद्र खोमणे या गायकांचा स्वरसाज लाभला आहे. संगीतकार अमितराज यांनी ही सर्व गीते संगीतबद्ध केली आहेत.
या चित्रपटातील गीतांना आपल्या मातीचा गंध असून शिवकाळात घेऊन जाणारी, मनाला भिडतील अशी ही गाणी करताना खूप समाधान लाभल्याची भावना संगीतकार अमितराज आणि गायिका आनंदी जोशी, गायक रवींद्र खोमणे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.