बांगडी व्यवसाय
बांगड्या म्हणजे महिलांचा हातातील एक अलंकार आहे. बांगड्यांना पारंपरिक महत्त्व आहे. लहान बाळापासून ते वृद्ध स्त्रीपर्यंत बांगडी हातात असते. बांगड्या सामान्यत: धातू, लाकूड, काच किंवा प्लास्टिकपासून बनविल्या जातात.

भारताच्या विविध भागात बांगड्यांना वेगवेगळे नाव आहे. ‘चूड़ी’, ‘चुरा’, ‘चौडिया’, ‘कंगन’ अशा नावांनी बांगडी ओळखली जाते. काही पुरुष आणि स्त्रिया हातात ‘कडा’ किंवा ‘कारा’ नावाची एकच बांगडी घालतात. शीख धर्मात शीख वधूचे वडील वधूला सोन्याची अंगठी, कारा आणि मोहरा देतात. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे भारतातील सर्वात मोठे बांगड्या उत्पादक आहेत.
समुद्री कवच, तांबे, कांस्य, सोने, इ. पासून बनवलेल्या बांगड्या संपूर्ण भारतीय उपखंडात वापरल्या जातात. प्राचीन भारतातील बांगड्यांच्या उदाहरणांमध्ये ‘माहुरझरी’ येथील उत्खननात आढळलेले तांब्याचे नमुने सांगता येतील.
भारताच्या जोधपूरमध्ये काचेच्या बांगड्या विक्रीसाठी असतात. या बांगड्या लवचिक नसतात. पांढऱ्या रंगाच्या समुद्राच्या शेलपासून बनवलेल्या बांगड्या ‘बंगाली’ आणि ‘उडिया’ स्त्रियांनी परिधान केल्या आहेत. बंगाल भागातील स्त्रिया खास बांगडी वापरतात, ती सामान्यत: ‘बंगाली बांगडी’ म्हणून ओळखली जाते.
बांगड्या पारंपारिक भारतीय दागिन्यांचा भाग आहेत. स्त्रिया पेहरावाच्या रंगानुसार बांगड्या घालतात. बहुतेक भारतीय महिला सोने किंवा काचेच्या बांगड्या वा दोघांचे मिश्रण असलेल्या बांगड्या घालणे पसंत करतात. अलीकडे प्लास्टिकपासून बनवलेल्या स्वस्त बांगड्या हळूहळू काचेच्या बांगड्यांची जागा घेत आहेत. काचेच्या बांगड्या लग्न आणि सण – उत्सवांमध्ये अजूनही पसंत करतात. विविध भारतीय नृत्य प्रकारात बांगड्या फार महत्त्वाची भूमिका बजावतात. काही नृत्य प्रकारांमध्ये संगीताच्या स्वरात एकमेकांना भिडणाऱ्या बांगड्या असतात.
साध्यापासून गुंतागुंतीच्या हस्तनिर्मित नक्षीकामाच्या बांगड्या अलीकडे बनविल्या जातात. त्याला बाजारात चांगली मागणी असते. बहुतेकवेळा हिरे, रत्ने आणि मोत्यासारख्या मौल्यवान वस्तूंनीही उत्तम बांगड्या बनविल्या जातात. रंगाची दुर्मिळता आणि त्यातील वेगळेपणा बांगड्यांचे मूल्य वाढवितात. लाखेपासून बनवलेल्या बांगड्या सर्वात जुन्या प्रकारांपैकी एक असून सर्वात ठिसूळ असतात.

स्त्रिया विविध प्रकारच्या आकर्षक बांगड्यांनी आपले हात सजवितात. त्यामुळे बांगड्यांना नेहमीच मागणी असते. बांगड्यांची मागणी कधीही कमी होऊ शकत नाही; त्यामुळे या व्यवसायात पैशाची गुंतवणूक करणाऱ्याला कधीही तोटा होणार नाही.
बाजारात मातीच्या बांगड्या, मण्यांच्या बांगड्या आणि धातूच्या बांगड्या असतात. या सर्व बांगड्या काच, सोने, धातू, कृत्रिम प्लास्टिक, रबर, चांदी, हस्तिदंत, तांबे आणि लाकडासारख्या साहित्याने बनवलेल्या आहेत.
ज्या व्यक्तीला हा व्यवसाय सुरू करायचा असेल त्याने त्याची मागणी समजून घ्यावी. कोणत्या प्रकारच्या बांगड्या बहुधा स्त्रिया पसंत करतात, याचा अभ्यास करावा. बाजारामध्ये टिकण्यासाठी एक उत्तम कल्पना घेऊन उतरायला हवे.
बाजारात सर्वाधिक ट्रेंडींग असलेला बांगडी प्रकार समजून घ्यायला हवा. बांगड्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी कमी वेळात बांगड्या बनविण्यासाठी, बांगड्या बनविण्याचे यंत्र वापरावे. यशस्वी विक्रेता किंवा निर्माता होण्यासाठी याबाबतचे प्राथमिक आणि मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. जर आपण बाजारात प्रचलित असलेल्या सर्व प्रकारच्या बांगड्यांची मागणी पूर्ण करण्यास सक्षम असाल, तर आपण या व्यवसायातून अमर्याद नफा मिळवू शकता.