Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

सिंधुदुर्गातील घडीवाडीचा किनारा

महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात देवगडमध्ये असलेला विजयदुर्ग किल्ला म्हणजे देवगड तालुक्याचे उत्तर टोक आहे. या किल्ल्यासमोर असलेला किनारा सुंदर आहेच; परंतु येथून दक्षिणेच्या दिशेने गेल्यावर  ‘दामलेमळा’, ‘कोठारवाडी’, ‘कालवशी’ वगैरे किनारे असून येथील ‘घडीवाडीचा किनारा’ प्रसिद्ध आहे.

गिर्ये गावाच्या रामेश्वर मंदिरामागे असलेला एक कच्चा रस्ता आपल्याला याठिकाणी घेऊन जातो. हा किनारा म्हणजे ही वाळूची पुळण नाही. हा खडकाळ किनारा आहे; परंतु इतर किनाऱ्यापेक्षा वेगळा असल्याने मनाला मोठा आनंद देऊन जातो. समुद्रापर्यंत असलेली लाल माती आणि जांभा खडकाचे वेगवेगळे आकार येथे दिसतात. हे खडकाळ किनारे आणि तिथली डबकी हे जैववैविध्याचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठिकाण आहे. येथे प्रवाळ, शैवाल, कालवे, विविध प्रकारचे खेकडे, समुद्री गोगलगायी यांचा मुक्त अधिवास असतो.  

येथील लाटांची खळखळ अगदी सौम्य असते. तो आवाज मन वेडावून सोडणारा असतो. हा किनारा पर्यटकांच्या गर्दीपासून खूप दूर आहे. एकांत देणारा, मन लुब्ध करणारा हा किनारा नक्की पहावा.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *