साबण निर्मिती
साबण ही प्रत्येकाची गरज आहे. बाजारात विविध प्रकारचे साबण वेगवेगळ्या किंमतीत विकले जातात. काही दर्जेदार कंपन्यांच्या साबणाची किंमत सामान्य वापराच्या साबणापेक्षा खूप जास्त असते, ज्यातून अशा कंपन्यांना भरपूर नफा मिळतो. तुम्हीही कमी गुंतवणुकीमध्ये साबण कारखाना उभारून भरपूर नफा कमवू शकता. आजच्या काळात साबणाचा वापर आंघोळीपासून ते कपडे धुणे किंवा भांडी साफ करण्यापर्यंत केला जातो.

साबण नूडल्स पाम तेल किंवा खोबरेल तेलापासून बनवले जातात. स्टोन पावडर हीदेखील एक आवश्यक साहित्य आहे. आवश्यकतेनुसार यात रंग, परफ्यूम वापरले जातात. साबण नूडल्सची किंमत 75 रुपये प्रति किलो आहे. 50 किलो कच्च्या मालासह साबण तयार करण्यासाठी एकूण 3500 रुपये खर्च येईल. तुम्ही घाऊक बाजारातून हा कच्चा माल खरेदी करू शकता. यासाठी रोमेटेरियल मिक्सिंग यंत्र, मिलर यंत्र, छपाई यंत्रांची आवश्यकता असते.
कोणत्याही घाऊक हार्डवेअर स्टोअरमधून आपण हे मिळवू शकता. संपूर्ण यंत्रसामग्रीची सेटअप किंमत कमीत कमी रु.65,000 पासून सुरू होते. साबण तयार करीत असताना सर्वप्रथम मिक्सरमध्ये 50 किलो साबण नूडल्स घालावेत. काही वेळाने त्यात स्टोन पावडर टाकावी. ही स्टोन पावडर नूडल्सच्या प्रमाणावर अवलंबून असते. ५० किलो नूडल्समध्ये सुमारे दीड किलो स्टोन पावडर घालावी लागते. आवश्यकतेनुसार साबणामध्ये रंग आणि परफ्यूम घालावा.
स्टोन पावडर आणि साबण नूडल्स चांगले मिसळले गेले पाहिजेत. मिलर मशीनमध्ये हे मिश्रण बारीक केले जाते. तुमचे उत्पादन चांगले बनवण्यासाठी तुम्ही हे मिश्रण 5 ते 6 वेळा यंत्राच्या सहाय्याने ‘फाइन-ट्यून’ करू शकता. या दरम्यान सुमारे अर्धा लिटर पाणी वापरा. पंधरा मिनिटांत 50 किलो कच्च्या मालाच्या मदतीने 100 ग्रॅम साबणाचे 500 तुकडे तयार केले जातात. यानंतर, हे मिश्रण पुढच्या यंत्रामधून म्हणजे साबण प्रिंटिंग मशीनमधून पार केल्यानंतर साबण म्हणून तयार होते.

साबण बनविण्याच्या प्रक्रियेत वापरला जाणारा कच्चा माल खरेदी करण्यासाठी तुम्हाला किमान 1 ते 2 लाख रुपये लागतील. यंत्रे आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी तुम्हाला किमान 2 ते 3 लाख रुपये खर्च करावे लागतील. त्याच्या विपणनासाठी, जाहिरात आणि वृत्तपत्रातील जाहिरात इत्यादींच्या खर्चासाठी महिन्याला किमान ५०००० रुपये लागतील. याशिवाय वीज बिल, जागेचे भाडे, कामगारांचा पगार, स्वतःचा पगार ही खर्चाची यादी लक्षात घेऊन तुमची गुंतवणूक करा.
साबण विकण्यासाठी वेष्टनबंद करताना काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. या व्यवसायासाठी आवश्यक असलेला परवाना पालिकेच्या व्यवसाय विभागाकडून घेतला जातो. दीर्घकालीन व्यवसायासाठी किंवा मोठ्या व्यवसायासाठी परवाना असणे आवश्यक आहे. साबण बनवण्याच्या व्यवसायात मार्केटिंगसाठी ब्रँडिंग हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. कारण याद्वारे तुम्ही तुमचे उत्पादन इतर उत्पादनांपेक्षा वेगळे करू शकाल. साबण व्यवसायातून बाजारात भविष्यात आणि आत्ताही मोठा नफा कमावण्याची शक्यता आहे. साबण बनविण्याचा व्यवसाय तुम्हाला चांगला फायदा देईल असा व्यवसाय आहे. तुम्ही किती मेहनतीने हा व्यवसाय करतात यावर अवलंबून आहे.