Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

कर्दे समुद्रकिनारा

महाराष्ट्रात रत्नागिरीतील दापोली समुद्रकिनाऱ्याच्या संपूर्ण पट्ट्यात कर्दे समुद्रकिनारा आहे. सर्वात निर्जन आणि शांत समुद्रकिनाऱ्यांपैकी हा किनारा आहे. सपाट मऊ वालुकामय समुद्रकिनारा पर्यटकांना आवडेल असाच आहे. हा दापोलीचा एक वैशिष्ट्यपूर्ण समुद्रकिनारा आहे. येथे पांढरीकाळी वाळू आढळते. कर्दे समुद्रकिनारा हा अतिशय रुंद आणि लांब असून दोन्ही बाजूंनी ‘बुरुंडी’ आणि ‘मुरुड हरणाई’पर्यंत पसरलेला आहे.

कर्देच्या दक्षिणेकडे ‘लाडघर’ आणि उत्तरेकडे ‘मुरुड हरणाई’ आहे. कर्दे आणि दापोलीमध्ये हॉटेल्स उपलब्ध आहेत. दापोलीतील सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी कर्दे हा एक आहे. येथे येणाऱ्याजाणाऱ्यांची वर्दळ फार कमी असते. त्यामुळे हा किनारा मनाला आनंदाची अनुभूती देतो. एकांत हवा असणाऱ्या, शांतप्रिय व्यक्तींसाठी हा किनारा खूप चांगला आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *