
नवी दिल्ली (पीटीआय) – माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाने शुक्रवारी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. तालकटोरा स्टेडियमवर रविवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात पवार यांची पुन्हा एकदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य नियुक्त करण्याचे अधिकार पवार यांना देण्यात आले.