Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

औंधची यमाई देवी

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात ‘औंध’ येथे यमाई देवीचे सुंदर मंदिर आहे. खटाव तालुक्यातील डोंगरावर असणारे हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. येथे शांतता आणि प्रसन्नता अनुभवता येते. यमाई म्हणजे शिव-पार्वती यांचे एकत्रित पुजले जाणारे रूप आहे. यमाई देवीला पार्वतीमातेचा त्याचबरोबर रेणुकादेवीचा अवतार देखील मानले जाते. महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यांमध्येही ‘यमाई’ देवीची अनेक मंदिरे आहेत, परंतु औंध येथे आदिमायेचे मुख्यपीठ आहे.

ज्योतिबा देवाच्या सांगण्यावरून औंधासुराचा वध करून ज्याठिकाणी देवी विसावली ते ठिकाण म्हणजे औंध असे मानतात. यमाई देवीचे अप्रतिम मंदिर येथे बांधण्यात आले आहे. सुमारे 432 पायऱ्या चढून गेल्यानंतर हे मंदिर आपणास दिसते.

टेकडीच्या पायथ्यापासून सुरू होणाऱ्या पायऱ्यावरून किंवा घाटरस्त्याने टेकडीच्या माथ्यावर पोहोचता येते. देवीची मूर्ती काळ्या पाषाणातील असून बैठी आहे. मूर्तीची उंची जवळपास 2 मीटर आहे. देवी पायाची मांडी घालून बसलेल्या स्थितीत आहे.

मंदिराच्या कळसावर विविध हिंदू देवतांच्या प्रतिमा आहेत. अलीकडेच लोकवर्गणीतून सोन्याचा कलश बसविला आहे. या टेकडीवरील मंदिराव्यतिरिक्त देवीचे आणखी 1 मंदिर या गावात आहे.

देवीचे दर्शन घेण्यासाठी औंधला गेलात तर तेथे औंधच्या महाराजांनी खासगी संग्रहातून स्थापन केलेले श्री भवानी संग्रहालय देखील पाहता येते. संग्रहालयाची इमारत मंदिर असलेल्या टेकडीच्या मध्यभागी आहे. या संग्रहालयात एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील प्रसिद्ध भारतीय कलाकारांनी रेखाटलेली अप्रतिम चित्रे पाहता येतात.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *