
एमजी मोटर इंडियाची नवीन गाडी ‘कॉमेट ईव्ही’ आत्ताच भारतात लाँच झाली असून देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बनली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, या गाडीचा महिन्याभरातील चार्जिंगचा खर्च फक्त 519 रुपये आहे. या इलेक्ट्रिक गाडीला खास शहरातील लोकांना समोर ठेवून बनविण्यात आले आहे. बिग इनसाइड, कॉम्पॅक्ट आउटसाइड ’फिलोसॉफी सोबत आलेली ‘एमजी कॉमेट ईव्ही’ टाटा टियागो ईव्हीपेक्षाही स्वस्त आहे. कॉमेट ईव्हीची सुरुवातीची किंमत फक्त 7 लाख 98 हजार रुपये इतकी आहे.

कंपनीचा दावा आहे की, 3 मीटर पेक्षा कमी लांबीच्या या कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक गाडीमध्ये कनेक्टिंग एलईइडी डीआरएल, एलईडी हेडलँप आणि टर्न इंडिकेटर्स सोबत एलईडी टेललँपसुद्धा दिले आहेत. या गाडीत ४ लोक सहज बसू शकतात. ‘एमजी कॉमेट ईव्ही’ मध्ये 17.3 केडब्ल्यूएचची लिथियम आयन बॅटरी दिली आहे. ती एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 230 किमीपर्यंत धावू शकते. ‘कॉमेट ईव्ही’मध्ये 3 ड्राइव्ह मोड दिले आहेत. ड्रायव्हिंग मध्ये कॉमेट ईव्ही उत्तम असून गर्दीच्या ठिकाणी व्यवस्थित चालवता येऊ शकते. तुम्ही घरी 7 तासात 3.3 किलोवॉट चार्जरच्या मदतीने बॅटरी पूर्ण चार्ज करू शकता. ‘एमजी कॉमेट ईव्ही’ मध्ये जबरदस्त फीचर्स दिले आहेत. वायरलेस अँड्रॉयड ऑटो आणि ॲपल कारप्ले सपोर्ट सोबत 10.25 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, 100 हून जास्त व्हॉइस कमांड, ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, एबीएस सोबत ईबीडी, फ्रंट आणि रियर 3 पॉइंट सीटबेल्टस, रियर पार्किंग कॅमेरा आणि सेन्सर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम हे आणि असे बरेच नवीन पर्याय या गाडीत उपलब्ध आहेत.