
टेक्नो कंपनीने एन्ट्री लेवल स्मार्टफोन ‘टेक्नो स्पार्क 10 ‘4 जी’ फिलिपिन्समध्ये लाँच केला आहे. हा हँडसेट मीडियाटेक प्रोसेसरने पॅक केला आहे. हा एक बजेट फोन आहे. हा फोन 18 वॅटची फास्ट चार्जिंगसह उपलब्ध आहे. या फोनमध्ये 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफर करण्यासाठी या फोनमध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट दिले आहे.
टेक्नोच्या या फोनमध्ये 6.6 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. तो एचडी प्लस रिझॉल्यूशन आणि 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटसोबत येतो. फ्रंटमध्ये वॉटरड्रॉप डिस्प्ले वॉचचा फायदा मिळतो.

या फोनमध्ये 8 जीबी रॅमसोबत 128 जीबीचे इंटर्नल स्टोरेज दिले आहे. फोनच्या बॅक पॅनेलवर दोन कॅमेरे उपलब्ध आहेत. 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसोबत एआय लेन्स आणि एलईडी फ्लॅश मिळते. ड्युएल एलईडी फ्लॅश सोबत 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनच्या साईडला फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे. ज्याला पॉवर बटनमध्ये इंटिग्रेट केले आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ, ड्युअल सिम आणि जीपीएस आणि 4 जी सपोर्ट मिळत आहे.