फिनाइल निर्मिती
औद्योगिक आणि घरगुती वापरात फिनाइलला आजच्या युगात खूप मोठी मागणी आहे. उत्पादन खर्च कमी असल्याने फिनाइल तयार करून विक्री करण्याच्या व्यवसायात नफ्याचे प्रमाण जास्त आहे. अर्धा लिटर ते 20 लिटरपर्यंतचे कॅन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. फिनाइल हे रसायन प्रत्येक घरात वापरले जाते.

आधुनिक जीवनशैलीमुळे जवळपास सर्वच ग्रामीण आणि शहरी घरांमध्ये फरशा आहेत. फरशी धुण्यासाठी जंतुनाशक म्हणून फिनाइलचा वापर रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. फिनाइलचे 2 प्रकार आहेत ‘काळे फिनाइल ‘ आणि ‘सफेद फिनाइल’. अलीकडे वेगवेगळ्या रंगांमध्ये फिनाइल मिळते. फिनाइल थंड किंवा गरम प्रक्रियेद्वारे तयार केले जाते.
पांढरे फिनाइल तयार करण्यासाठी 1 किलो ‘सल्फोनेटेड एरंडेल तेल’ आणि 1 किलो ‘एमएल पाइन तेल’ मिसळतात. एका मोठ्या प्लास्टिकच्या टब किंवा बॅरलमध्ये घेतात. या मिश्रणाचा रंग खाद्यतेलासारखा होईपर्यंत विरघळवले जाते. रासायनिक द्रव्ये विक्री करणाऱ्या दुकानांतून ‘कॉन्सन्ट्रेटेड व्हाईट क्लीनर’च्या नावाने हे पदार्थ तयार स्वरूपातही मिळतात. तयार मिश्रणात 20 ते 25 लिटर पाणी घालतात. लाकडी काठीने हे मिश्रण अनेक वेळा ढवळून घेतात. यातून पांढऱ्या रंगाचे फिनाईल तयार होते.
काळ्या रंगाचे फिनाइल तयार करण्यासाठी राळ आणि सोडा वापरला जातो. येथे जी प्रक्रिया केली जाते, तिला गरम प्रक्रिया म्हणतात. काळे फिनाइल तयार करण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीत 250 मि.ली. ‘दादो पाइन’ आणि 250 मि.ली. ‘टी.आर ओ.’ ही 2 रसायने मिसळून ती भरपूर विरघळवतात. पेस्टसारख्या मिश्रणात सुमारे 50 लिटर पाणी मिसळतात. या प्रक्रियेद्वारेही काळे फिनाइल तयार केले जाते.

ही रासायनिक प्रक्रिया असल्याने आणि फिनाइल तयार करण्याच्या विविध पद्धती असल्याने रासायनिक तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्यावे. बाजारात विक्रीसाठी असलेली फिनाइल उत्पादने वेगवेगळ्या सूत्रांनी तयार केलेली दिसतात. रासायनिक उत्पादनामुळे होणारी शारीरिक इजा होऊ नये, म्हणून प्रत्यक्ष प्रशिक्षण घेऊन उत्पादनाचा अनुभव घ्यावा असे सांगण्यात येते. उत्तम दर्जाचे फिनाइल तयार करणे हे व्यवसायवाढीचे यशस्वी सूत्र आहे. बाजार पालिका, सरकारी व खासगी कार्यालये, रुग्णालये, हॉटेल्स, लॉजिंग, शोरूम्स हे फिनाईल विक्रीसाठी चांगले ग्राहक आहेत. तुम्ही त्यांच्याकडून ऑर्डर घेऊन आपली उत्पादने वितरीत करू शकता.
फिनाइल उत्पादनाची किंमत कमी असल्याने आपण चांगली कमाई करू शकता. औद्योगिक वसाहती, रुग्णालयांमध्ये फिनाइलचा वापर जास्त असल्याने 5 लिटरपासून ते 20 लिटरच्या कॅनमध्ये हे फिनाइल घेतले जाते. हा उद्योग आता लहान शहरांमध्येही तरुण करताना दिसत आहेत. या उत्पादनासाठी मिश्रण मिसळण्याकरिता मोठे मिक्सर, बाटल्यांचे वेष्टन, लेबलिंग यंत्र, पाण्याची मोटर, बॅरल, टॅप ड्रम, लहान प्लास्टिकची भांडी आणि रासायनिक उपकरणे ही साधने लागतात.