
केस गळण्याची समस्या अनेकांना त्रासदायक ठरत आहे. अगदी तरुण वयात टक्कल पडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. बाबा रामदेव यांनी यासाठी काही सहजसोपे उपाय सांगितले आहेत.
योग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. योगामुळे शरीर निरोगी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे योगामुळे तुमची त्वचा आणि केस वाढण्यास मदत होते. डोकेदुखी दूर होते. चक्कर येण्याची समस्या कमी होते. म्हणून शीर्षासन करण्याचा सल्ला ते देतात. शीर्षासनामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. केसांची समस्या नाहीशी होते.

दुधीचा रस आणि आवळ्याचे सेवन नियमितपणे करण्यास सांगतात. यामुळे केसांची वाढ तर होईलच; त्याचप्रमाणे वजन कमी होण्यासदेखील मदत होईल. आयुर्वेदात आवळ्यालादेखील खूप महत्त्व देण्यात आले आहे. केसांच्या वाढीसाठी आवळा खूपच महत्त्वाचा ठरतो. रोज आवळ्याचे सेवन करा. केसांच्या वाढीसाठी आवळा कॅन्डीचे सेवनसुद्धा करू शकता.
त्रिफळा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही केसांच्या मुळांना पोषण देते. त्रिफळामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. म्हणून त्रिफळाचा वापर करावा, असेही ते सुचवितात.