
हिंदी,तमिळ, तेलुगु आणि मल्याळम या भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रदर्शित झाला आहे. ‘ट्रेलर’ मुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट 5 मे 2023 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
‘द केरळ स्टोरी’ ट्रेलरमधून दहशतवादाचे भयानक दृश्य संपूर्ण जगाने पाहिले आहे. भारतातही दहशतवादाने पंख पसरले आणि खूप नुकसान केले. ही अशी एक कथा आहे, जेव्हा केरळमध्ये मुलींना आमिष दाखवून दहशतवादाच्या तावडीत अडकवले गेले. अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्यांचे कुटुंबीय वेदना आणि असहायतेच्या संकटात ढकलले गेले. ‘सनशाइन पिक्चर्स’ ने हा 2 मिनिटे 45 सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकते. या कथेत ‘इसीस’ ने 32 हजार महिलांना ओलीस ठेवल्याची कहाणी दाखविण्यात आली आहे. हे षडयंत्र कसे रचले गेले, कोणाचा वापर केला गेला आणि महिलांना कैदेत ठेवल्यानंतर त्यांच्याबाबत काय केले गेले, हे सर्व या चित्रपटात दाखविले आहे. यात महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या निष्पाप मुलींना कसे ‘लक्ष्य’ करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आले, हे दाखवण्यात आले आहे.

‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. यात ‘लव्ह जिहाद’ चा अवलंब करून इतर धर्मातील महिलांना कसे फसवले गेले आणि ‘इस्लाम’बद्दल चुकीची माहिती पसरवून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला हे दाखविण्यात आले आहे. ही कथा सन 2018-19 मध्ये घडलेल्या घटनांवरून प्रेरित आहे, जेव्हा अचानक तरुण मुली गायब होऊ लागल्या.
या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले आहे. अभिनेत्री अदा शर्मा यात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृताल शाह यांनी केली असून दिग्दर्शक सुदिप्तोसोबत त्यांनी चित्रपटाची कथाही लिहिली आहे. चित्रपट पाहिल्यावर असे वाटते की यात आशय आणि प्रासंगिकता दोन्ही आहे.