
‘द सुपर मारिओ ब्रदर्स’ हा चित्रपट एप्रिल 2023 चा संगणक-ॲनिमेटेड साहसी चित्रपट आहे. हा चित्रपट ‘व्हिडिओ गेम फ्रँचायझी’ वर आधारित आहे. ‘युनिव्हर्सल पिक्चर्स, इल्युमिनेशन आणि निन्टेन्डो’ द्वारे निर्मित व ‘युनिव्हर्सल’द्वारे वितरीत केलेला हा चित्रपट आहे. ‘ॲरॉन हॉर्व्हथ’ आणि ‘मायकेल जेलेनिक’ यांनी दिग्दर्शित केला आहे. मॅथ्यू फोगेल यांनी लेखन केले आहे.
ख्रिस प्रॅट, अन्या टेलर-जॉय, चार्ली डे, जॅक ब्लॅक, कीगन-मायकेल की, सेठ रोजेन आणि फ्रेड आर्मिसेन यांचा ‘व्हॉइस कास्ट’ मध्ये समावेश आहे. हा चित्रपट म्हणजे ‘मारियो’ आणि ‘लुइगी’ या दोन इटालियन-अमेरिकन प्लंबरची मूळ कथा आहे, ज्यांना एका वेगळ्या जगात नेले जाते. तेथे प्रिन्सेस पीचच्या नेतृत्वाखालील ‘मशरूम किंगडम’ आणि ‘बोझर’च्या नेतृत्वाखालील ‘कूपस’ यांच्यातील लढाईत ते अडकतात.

‘सुपर मारियो ब्रदर्स’ चित्रपट 5 एप्रिल 2023 रोजी युनायटेड स्टेट्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समीक्षकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या, परंतु प्रेक्षकांचा प्रतिसाद अधिक सकारात्मक होता. या चित्रपटाने जगभरात 909.8 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त कमाई केली आहे, ज्यामुळे तो 2023 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. ‘ॲनिमेटेड’ चित्रपटासाठी जगभरातील बॉक्स ऑफिस रेकॉर्ड आणि व्हिडिओ गेमवर आधारित सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट आहे.