Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

अनोखी प्रेमकथा सरी

मराठी मनोरंजन विश्वात अनेक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. २०२२ च्याअखेरीस प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ चित्रपटाने अनेकांच्या मनावर राज्य केले. वेडनंतर आणखी एक प्रणयकथा ‘सरी’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा ‘टीझर’ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. त्यामुळे रसिकांची उत्कंठा वाढली आहे. दिनांक 5 मे, 2023 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

रितीका श्रोत्री, पृथ्वी अंबर आणि मृणाल कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या ‘टीझर’ मध्ये प्रेमाचे त्रिकुट दिसत आहे. दियाच्या (रितीका श्रोत्री) आलेल्या 2 मुलांसोबत तिची मैत्री होते, ती दोघांच्याही प्रेमात पडते. शेवटी काय होते ? दिया स्वतःला त्रास करून का घेते? तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात? ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार? या प्रेमकथेचा शेवट काय होणार? अर्थातच, यासाठी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहावा लागेल.

‘कॅनरस प्रॅाडक्शन’ प्रस्तुत डॉ. सुरेश नागपाल आणि आकाश नागपाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन, संकलन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक अशोका के. एस. यांनी केले आहे. विशेष म्हणजे ‘सरी’ या चित्रपटाच्या निमित्ताने ते प्रथमच मराठीत पदार्पण करीत आहेत. ‘रिलायन्स एंटरटेनमेंट’ने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे. सुप्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी संगीत दिले आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *