Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

कुटुंबीयांनी पहावी अशी हॅप्पी फॅमिली

‘हॅप्पी फॅमिली’ ही ‘ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली कुटुंबासह पाहण्यासाठी एक विनोदी वेबमालिका आहे. मार्च २०२३ मध्ये ती प्रदर्शित झाली, आणि तिला तुफान प्रतिसाद मिळाला. ढोलकिया कुटुंबाची ही कथा आहे. जिथे 4 पिढ्या एकाच छताखाली राहतात. राज बब्बर, रत्ना पाठक शाह, अतुल कुलकर्णी, आयेशा झुल्का, मीनल साहू आणि रौनक कामदार हे अनुभवी कलाकार या वेबमालिकेचे मुख्य आकर्षण आहेत. जमनादास मजेठिया (जेडी) आणि आतिश कपाडिया यांनी या मालिकेचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे.

हे कुटुंब पारंपरिक आणि आधुनिक मूल्यांचे मिश्रण आहे. ढोलकिया त्यांच्या उत्साही व्यक्तिमत्त्वासाठी आणि अतुलनीय वैशिष्ट्यपूर्ण स्वभावासाठी ओळखले जातात. ढोलकिया कुटुंबात चार पिढ्या एकाच छताखाली राहत असून त्यांच्या आयुष्यातील अनेक चढ-उतार एकत्र सोडवितात. आतिश कपाडिया आणि जमनादास मजेठिया या मालिकेचे निर्माते आहेत. खुमासदार विनोदी शैलीमुळे ही वेबमालिका जवळची वाटते. सर्व कुटुंबीयांनी एकत्र बसून पाहण्यासारखी ही मालिका आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *