Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

मुंबईत आज राष्ट्रवादीची बैठक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याने पुढील अध्यक्ष कोण, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. पक्षातील नेत्यांकडून शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होत आहे.

या बैठकीत शरद पवार यांच्या निवृत्तीबाबत चर्चा होणार असून पुढील अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुरुवारी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे तेच या पदावर राहण्याची शक्यता आहे. ते आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता जास्त आहे. आजच्या बैठकीत याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. अलीकडे पक्षातील काही नेत्यांबाबत अनेक बातम्या येत असताना पक्षाला एकसंघ बांधून ठेवण्यासाठी काय करता येईल, याचा विचार होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्याध्यक्ष पदाचा विचार होण्याची शक्यता आहे. यासाठी सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे केले जाऊ शकते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात अध्यक्षपद सोडण्याच्या केलेल्या घोषणेने राजकीय पटलावर अनेक तर्क लढविले जात आहेत. कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनीच अध्यक्षपदी रहावे, असा आग्रह धरला आहे. 2 दिवसांपासून पवार यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अखेर कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल, असे पवार यांनी जाहीर केले. त्यामुळे आजच्या बैठकीत मोठी घोषणा होण्याची शक्यता असल्याने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *