Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

अजय बंगा जागतिक वित्तसंस्थेत परिवर्तन घडवतील

”जागतिक बँकेचे नवे प्रमुख अजय बंगा हे आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेत कौशल्य, अनुभव आणि नाविन्यपूर्ण काम करून परिवर्तन घडवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सिद्ध होतील,” असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केला आहे.

‘मास्टरकार्ड’ चे पूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बंगा यांची बुधवारी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या प्रतिष्ठित संस्थेचे प्रमुख बनणारे बंगा हे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती बनले आहेत.

जागतिक बँक भागधारकांच्या नेतृत्वासह संस्थेला पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक मूलभूत बदल घडू शकतात. ही काळाची गरज आहे. बंगा यांना या पदासाठी स्वतः बायडेन यांनी नामांकन दिले होते. बंगा यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासोबतही काम केले आहे. ते ‘पार्टनरशिप फॉर सेंट्रल अमेरिका’चे सह-प्रमुख होते. सन 2020-22 या वर्षात बंगा हे ‘इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स’ चे मानद अध्यक्ष आहेत. ते ‘ॲक्सर’ कंपनीचे अध्यक्ष आहेत.

याआधी, ते ‘अमेरिकन रेड क्रॉस’, ‘क्राफ्ट फूड्स’ आणि ‘डाऊ इंक’च्या संचालक मंडळाचादेखील एक भाग राहिले आहेत. त्यांनी ‘यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम’ चे संस्थापक विश्वस्त आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या अंतर्गत सायबर-सुरक्षा आयोगाचे सदस्य म्हणूनही काम केले आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *