Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

युरोपमधील देशांमध्ये महागाईत वाढ

युरोपमधील देशांमध्ये महागाई शिगेला पोहोचली आहे. रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे जीवनावश्यक खाद्यपदार्थांबरोबर गॅस आणि तेलाच्या किंमतीही वाढल्या आहेत. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर युरोपियन युनियनच्या मध्यवर्ती बँकेने धोरणात्मक व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या प्रमुख क्रिस्टीन लगार्ड यांनी गुरुवारी ही घोषणा केली.

अमेरिकेतही महागाई वाढत आहे. याच्या एक दिवस आधी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनेही पॉलिसी व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांत महागाई कमी झाली आहे. त्यामुळेच यावेळी केवळ एक चतुर्थांश टक्के वाढ करण्यात आली. यापूर्वी, युरोपियन मध्यवर्ती बँकेने व्याजदरात सहा वेळा 0.50-0.75 टक्क्यांनी वाढ केली होती.

आकडेवारीनुसार, अमेरिकेत महागाई कमी झाली असली तरी ती अपेक्षेपेक्षा जास्त आहे. आकडेवारी पाहता महागाईचा दर खाली यायला वेळ लागेल असे म्हणता येईल. फेड चेअर जेरोम पॉवेल यांनी स्वतः कबूल केले, की महागाई कमी करण्याच्या प्रक्रियेला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

युक्रेन-रशिया युद्धात अमेरिकेसह इतर देश युक्रेनला मदत करीत आहेत. युक्रेनला वेळोवेळी आर्थिक मदत दिली जात आहे, जे अमेरिकेतील महागाईचे प्रमुख कारण आहे. पूर्वी अमेरिका रशियासोबत कच्च्या तेलाचा व्यापार करत असे. या युद्धामुळे रशियाकडून तेल आणि वायू खरेदीवर दीर्घकाळ बंदी आहे. त्यामुळे युरोपमध्ये तेल आणि वायूच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *