Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

व्यक्तिमत्त्व विकास

व्यक्तिमत्त्व विकास कसा करावा, यासाठी खास वर्गांचे आयोजन केले जाते, यावरून ते किती महत्त्वाचे आहे, हे समजते. व्यक्तीच्या अंगी आत्मविश्वास, सकारात्मकता आणि दयाळूपणा, समोरच्याचे ऐकण्याची वृत्ती, प्रभावी संवादकला, अशा आणि यासारख्या सर्व गुणांचा समावेश असणे महत्त्वाचे असते. हे गुण वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातही मोलाचे ठरतात.

व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी स्वतःमध्ये सकारात्मक दृष्टीकोन आणणे सर्वात महत्वाचे आहे. सकारात्मक दृष्टीकोन इतरांना आपणाकडे आकर्षित करतो. त्यामुळे आपले समोरच्या व्यक्तीसोबत स्नेहसंबंध प्रस्थापित होतात. हा दृष्टीकोन अंगात मुरण्यासाठी जीवनातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा आवर्जून प्रयत्न करायला हाव. नकारात्मक विचार टाळायला हवेत. आपणापाशी जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायाला हवी. व्यक्तिमत्व विकसित करणे इतके सोपे नाही. यासाठी खूप मेहनत करावी लागते.

मनात आत्मविश्वास असायला हवा. तो नसेल तर आणण्याचा प्रयत्न करा. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिका. आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःमधील उत्कृष्टता ओळखा. स्वतः मधील न्यूनगंड बाजूला सारा.

प्रभावी संवाद करायला शिकले पाहिजे. यामध्ये केवळ बोलणेच नाही तर ऐकणे देखील समाविष्ट आहे. संवाद सुधारण्यासाठी समोरच्याचे ऐकून घ्या. इतरांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपले दुसऱ्याने ऐकावे असे वाटत असेल तर दुसऱ्याचेही आपण ऐकले पाहिजे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *