
साहित्य : १ किलो साखर, ४०० मिली. पाणी, अर्धा लहान चमचा सायट्रिक ॲसिड, पाव लहान चमचा रासबेरी लाल रंग, अर्धा चमचा रोझ इसेन्स.

कृती : प्रथम १ किलो साखरेमध्ये ४०० मिली. पाणी मिसळावे. त्यात अर्धा चमचा सायट्रिक ॲॅसिड घालावे. सर्व एकत्र करून गॅसवर एक उकळी येईपर्यंत ठेवावे. गार झाल्यावर त्यात रंग व इसेन्स घालावा. नंतर हे गाळून बाटलीत भरावे. सरबत देताना पाव भाग तयार केलेले द्रावण आणि पाऊण भाग पाणी किंवा दूध घालून पिण्यास द्यावे.