Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

मुंबईत ‘जी-२०’ च्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाची बैठक

मुंबईत येत्या १५ ते १७ मे दरम्यान ‘जी-२०’ अंतर्गत तिसऱ्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी या बैठकीच्या नियोजनाबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत नवी दिल्लीतून केंद्रीय ऊर्जा सचिव आलोक कुमार दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.

मंत्रालयात झालेल्या या आढावा बैठकीला पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, ऊर्जा विभाग प्रधान सचिव आभा शुक्ला, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त वेलारासू, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, उद्योग विकास आयुक्त माणिक गुरसळ, माहिती संचालक हेमराज बागूल, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे उपस्थित होते.

या बैठकीत विभाग प्रमुखांना विविध सूचना करण्यात आल्या. ‘जी-२०’ बैठकीसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना आवश्यक सेवासुविधा उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी संबंधित विभागांनी समन्वय अधिकारी नियुक्त करावेत. त्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे, असे मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले. केंद्रीय ऊर्जा सचिव आलोक कुमार यांनी राज्य सरकारच्या वतीने अपेक्षित सहकार्याबाबत माहिती दिली. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत संबंधित विभागांनी कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिल्या.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *