Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

अंतराळात आजपासून दिसणार अवकाश स्थानक

अंतराळाच्या अभ्यासासाठी जगातील १६ देशांनी एकत्र येऊन 1 महाकाय आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक उभारले आहे. दिनांक ११ ते १६ मे दरम्यानच्या कालावधीत पहाटे आणि रात्री या अवकाश स्थानकाचे दर्शन होणार आहे, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी दिली.

हे अवकाश स्थानक ताशी २८ हजार किलोमीटर या वेगाने साधारण ४०० किलोमीटर अंतरावरून पृथ्वीभोवती फिरणार आहे. नुसत्या डोळ्यांनी पाहून त्याचा आनंद घेता येईल. या कालावधीत पहाटे 6 वेळा आणि रात्री 6 वेळा असे 12 वेळा दर्शन होणार आहे. ११ मे रोजी रात्री ७.१३ ते ७.१६ या कालावधीत ते दक्षिण बाजूला पूर्वेकडे जाताना दिसेल. पुन्हा रात्री ८.४८ ते ८.५१ या वेळेत पश्चिमेकडून उत्तर बाजूस हा आकाश नजारा बघता येईल. १२ मे रोजी पहाटे ५.०२ ते ५.०७ पर्यंत उत्तरेकडील आकाशात पूर्वेकडे फिरत जाताना दिसेल. रात्री ७.५९ ते ८.०६ यावेळी नैऋत्य ईशान्य आकाशात बघता येईल.

दिनांक १३ मे रोजी पहाटे ४.०९ ते ४.१८ या वेळेत उत्तर पूर्व बाजूला आणि संख्याकाळी ७.११ ते ७.१७ च्या दरम्यान नैऋत्य ईशान्य दिशेला दिसेल. दिनांक १४ मे रोजी पहाटे ५.०१ ते ५.०८ दरम्यान वायव्य ते आग्नेय आकाशात दिसेल. रात्री ८ ते ८.०४ या वेळेत पश्चिमेकडून उत्तर बाजूस पाहता येईल. दिनांक १५ मे रोजी पहाटे ४.१३ ते ४.१९ दरम्यान उत्तरेकडून पूर्वेकडे आणि रात्री ७.११ ते ७.१६ यावेळी पश्चिमेकडून उत्तर बाजूस बघता येईल. १६ मे रोजी पहाटे ३.२९ ते ३.३० यावेळी पूर्व आकाशात अगदी कमी वेळासाठी दिसेल. पुन्हा पहाटे ५.०२ ते ५.०६ दरम्यान पश्चिम आकाशात दक्षिणेकडे जाताना दिसेल. हे अवकाश स्थानक पाहून याचा आनंद लुटावा, असे सांगण्यात आले आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *