नवी मुंबईत महिलांसाठी सावली प्रकल्प
नवी मुंबई पोलिसांच्या वतीने नेरूळ येथे महिलांसाठी ‘सावली’ ही प्रकल्प इमारत बांधण्यात आली. या इमारतीचे उद्घाटन आणि ‘निर्भया’ पथकाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

पीडित महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘शक्ती सदन’ योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 50 ठिकाणी ‘शक्ती सदन’ तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकार ६० टक्के निधी देणार असून ४० टक्के निधी राज्य सरकार देणार असल्याची माहिती यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
?नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत महिला सुरक्षा प्रकल्पाचे उदघाटन आज दुपारी नेरूळ (नवी मुंबई) येथे केले.
महिला सहाय्य पथक, पीडितांना समुपदेशन, निवारा आणि सायबर पोलीस हे एकाच इमारतीत असल्यामुळे महिला तक्रारदारांची सोय होणार आहे.हे महिला सहाय्यता कक्ष सावली इमारत येथे असून,… pic.twitter.com/H8qlOExNwU
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 11, 2023
‘शक्ती सदन’ मध्ये पिडीत महिलेला 3 वर्षांपर्यंत राहता येणार आहे. तिथे तिची संपूर्ण व्यवस्था करण्यासोबत तिला भत्ताही दिला जाणार आहे. ‘शक्ती सदन’ अशा महिलांना प्रेरणा देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुढच्या 6 महिन्यांत संपूर्ण राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी यावेळी दिली. येत्या 1-दोन महिन्यात ‘निर्भया’ पथकाच्या ताफ्यात अजून 10 चारचाकी वाहने समाविष्ट केली जाणार आहेत. त्यानुसार २० पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात एक निर्भया पथक कार्यान्वित होणार आहे. या वाहनांच्या माध्यमातून ‘पेट्रोलिंग’ केले जाणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.