Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून तक्रारींची दखल

भारतातील अनेक व्हॉट्सॲप वापरकर्त्यांनी ट्विटर या समाजमाध्यमाच्या व्यासपीठावर तक्रारी नोंदविल्या आहेत. अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबरवरून व्हॉट्सॲपवर फोन येत असल्याचे त्यांनी म्हटले असून माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने त्याची दखल घेतली आहे.

अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबरवरून व्हॉट्सॲपवर अनोळखी फोन आल्यास, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय मेसेजिंग ॲपला नोटीस पाठवेल, असे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गुरुवारी सांगितले. ते म्हणाले की, ‘वापरकर्त्याची सुरक्षा सुनिश्चित करणे ही संबंधित प्लॅटफॉर्मची जबाबदारी आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी जबाबदार आहेत. वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा कथित गैरवापर झाल्यास तसेच कथित उल्लंघनाच्या प्रत्येक प्रकरणाला सरकार प्रतिसाद देईल.” व्हॉट्सॲप क्रमांक कसे चिन्हांकित केले जात आहेत, हे क्रमांक त्यांच्यापर्यंत कसे पोहोचत आहेत आणि त्यासाठी डेटाबेसचा वापर केला जात आहे का, या बाबीही तपासण्यात येत असल्याचे त्यांनी सूचित केले. गेल्या काही दिवसांपासून भारतातील मोठ्या संख्येने व्हॉट्सॲप वापरकर्ते अनोळखी आंतरराष्ट्रीय फोन येत असल्याच्या तक्रारी करीत आहेत.

बहुतेक अनोळखी फोन इंडोनेशिया (+62), व्हिएतनाम (+84), मलेशिया (+60), केनिया (254) आणि इथियोपिया (+251) मधील क्रमांकांवरून आले आहेत. चंद्रशेखर यांनी गुरुवारी सांगितले, की मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. यासंदर्भात व्हॉट्सॲपला नोटीस पाठवली जाईल. ‘पब्लिक अफेअर्स फोरम ऑफ इंडिया’ ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *