
ऑस्ट्रेलियाच्या ‘ब्लॅकटाउन सिटी कौन्सिल’ ने सिडनीमध्ये ‘शिख फॉर जस्टिस’ साठी खलिस्तानींनी आयोजित केलेला प्रचार सार्वमत कार्यक्रम रद्द केला आहे. या सार्वमतामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत शेकडो तक्रारी आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आर.पी. सिंह यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे.
आर.पी. सिंह यांनी ट्विट केले की, ”मी ब्लॅकटाउन सिटी कौन्सिल, सिडनीच्या खलिस्तान सार्वमत कार्यक्रमावर बंदी घालण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. मला आशा आहे की ऑस्ट्रेलियातील इतर सिटी कौन्सिलदेखील त्याचे अनुकरण करतील.ऑस्ट्रेलियातील ‘सिख फॉर जस्टिस’च्या निधीच्या स्त्रोताची देखील चौकशी करणे अपेक्षित आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये खासगी आणि तिची मर्यादित कंपनी म्हणून नोंदणी केली आहे.”
‘शिख फॉर जस्टिस’ मोहिमेचा कार्यक्रम ब्लॅकटाउन लेझर सेंटर स्टॅनहॉप येथे होणार होता; परंतु सुरक्षा एजन्सींच्या सतर्कतेमुळे त्याची नोंदणी आता रद्द करण्यात आली आहे, असे ‘ऑस्ट्रेलिया टुडे’ च्या वृत्तात म्हटले आहे.
‘ब्लॅकटाऊन सिटी कौन्सिल’ च्या प्रवक्त्याने ‘द ऑस्ट्रेलिया टुडे’ ला सांगितले, की कौन्सिलचा निर्णय हा कोणत्याही प्रकारे भारत किंवा पाकिस्तानच्या अंतर्गत प्रकरणांशी संबंधित नाही. कोणत्याही राजकीय स्थितीचे समर्थन किंवा टीका नाही. कोणत्याही विशिष्ट राजकीय स्थितीचे समर्थन म्हणून त्याला सादर केले जाऊ नये.