Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

ट्विटरची मुख्य कार्यकारी अधिकारी होणार महिला

अमेरिकन अब्जाधीश एलन मस्क यांनी ट्विटरची जबाबदारी नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हातात असेल, असे जाहीर केले आहे. या पदावर महिला असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घोषणेनंतर अनेक नावांची चर्चा सुरू झाली असून लिंडा याकारिनो यांचे नाव अग्रेसर आहे. ट्विटरसाठी नवीन नियुक्ती केल्याचे जाहीर करताना आनंद होत असल्याचे मास्क यांनी म्हटले आहे. मस्क यांनी असेही सांगितले की ते त्यांची भूमिका बदलून कार्यकारी अध्यक्ष म्हणून उत्पादने, सॉफ्टवेअर आणि सिस्टीम ऑपरेशन्सवर देखरेख ठेवत आहेत.

लिंडा याकारिनो या चर्चेत होत्या. ‘एनबीसीयु’ आस्थापनेच्या प्रवक्त्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, याकारिनो ‘एनबीसीयु’ वाढवण्यासाठी खूप काम करीत आहेत. लिंडा याकारिनो सध्या ‘एनबीसीयु’ च्या जागतिक जाहिरात आणि भागीदारी प्रमुख आहेत. याकारिनो हा माध्यम विश्वातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. गेल्या 20 वर्षांपासून त्या ‘एनबीसी युनिव्हर्सल’ शी निगडीत असून अनेक नेतृत्वदायी भूमिका पार पाडल्या आहेत. याआधीही त्यांनी इतरही अनेक मोठ्या पदांवर काम केले आहे. अहवालानुसार, लिंडा यांनी यापूर्वी ट्विटर सीईओ बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. या यादीत एला इर्विन यांचेही नाव येत असले तरी एला सध्या ट्विटरच्या ट्रस्ट आणि सेफ्टी विभागासाठी काम करीत आहेत.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *