Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

रंगभूमीवरील जन्मवारी

सध्या रंगभूमीवर समान परिस्थितीत वेगवेगळे आयुष्य जगणाऱ्या मुलींचा प्रवास दाखविणारे हर्षदा बोरकर लिखित-दिग्दर्शित ‘जन्मवारी’ नाटक सुरु आहे. या नाट्यकृतीस रसिक प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. संपदा जोगळेकर-कुळकर्णी (मंजू), कविता जोशी (वृंदा), अमृता मोडक (शामा), शुभांगी भुजबळ (विठा), शर्वरी कुळकर्णी-बोरकर (कान्होपात्रा) यांनी या नाटकात उत्तम भूमिका साकारल्या आहेत.

हर्षदा बोरकर यांनी वेगवेगळ्या काळांतील 5 स्त्रियांचे समांतर आयुष्य या नाटकात मांडले आहे. पौराणिक कथेला आधुनिक संदर्भ देत ‘जन्मवारी’ सादर केले आहे. माणसाचे आयुष्य घडवू तसे घडू शकते, हा संदेश हे नाटक देते. सुरुवातीला प्रेक्षकांना गुंतागुंत वाटते, पण नंतर मात्र एक सुखद अनुभव मिळतो. या नाटकाचे नेपथ्य सचिन गावकर यांनी केले असून संगीत मंदार देशपांडे यांनी दिले आहे. प्रकाशयोजना अमोघ फडके, रंगभूषा/ केशभूषा नेहा जगताप यांची आहे. या नाटकात विठ्ठलभक्ती करणारी कान्हा, विठा, राजगणिका शामा, समाजसेवेत रमणारी वृंदा, वेश्याव्यवसाय करणारी मंजू अशा पाचजणी भेटतात. त्यांचे आयुष्य मनाला स्पर्शून जाते.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *