
अमेरिकेच्या सिनेटने भारतीय-अमेरिकी गीता राव गुप्ता यांची महिलांशी संबंधित जागतिक समस्यांसाठी परराष्ट्र विभागातील ‘ॲम्बेसेडर एट लार्ज’ म्हणून नियुक्ती केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी ट्विट केले, की अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाद्वारे महिला आणि मुलींच्या अधिकारांसाठी गुप्ता यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ते फार प्रभावित झाले आहेत.
या आठवड्याच्या सुरुवातीला गुप्ता यांच्या नियुक्तीला अमेरिका सिनेटमध्ये 51-47 अशा मतांनी पुष्टी मिळाली. गुप्ता यांच्या मते, जगभरात अनेक पातळीवर असमानता आहे. याचा महिलांना बराच सामना करावा लागतो. यामुळे त्यांना अर्थव्यवस्थेत पूर्णपणे सहभागी होण्यापासून रोखले जाते. आपल्या सुरक्षेला धोका आहे, असे महिलांना वाटते. त्यांना दैनंदिन हिंसाचाराची भीती वाटते. यामुळे त्या अस्थिर होत असतात.
गीता राव गुप्ता यांना महिलांच्या समस्यांची चांगली जाण असल्याने त्या या पदास उत्तम न्याय देतील, असा विश्वास समकक्षांकडून व्यक्त केला जात आहे.