
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पुढील आठवड्यात इंडो-पॅसिफिकमधील जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियाला भेट देणार आहेत. त्यांची ही भेट त्यांच्या प्रशासनाची या प्रदेशाबाबतची वचनबद्धता अधोरेखित करेल. ‘पापुआ न्यू गिनी’ या बेट राष्ट्राला भेट देणारे बायडेन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष असतील.
त्यांच्या भेटीद्वारे बायडेन यांना हे दाखवून द्यायचे आहे की, ते अमेरिकेला आणखी पुढे नेण्यास सक्षम आहेत. त्यांनी नुकतीच राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. अमेरिकेतील कर्जाच्या संकटावरून काँग्रेसच्या रिपब्लिकन सदस्यांशी त्यांचे मतभेद आहेत. या भेटीचा एक भाग म्हणून, ‘जी-७’ शिखर परिषदेसाठी बायडेन प्रथम जपानच्या ‘हिरोशिमा’ शहरात जाणार आहेत.
येत्या आठवडाभरात बायडेन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बराच वेळ घालवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘हिरोशिमा’ येथे मोठ्या औद्योगिक राष्ट्रांच्या बैठकीला जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी निमंत्रित केलेल्या बिगर ‘जी-७’ देशांच्या 8 नेत्यांमध्ये मोदी यांचा समावेश असेल.

‘पापुआ न्यू गिनी’ मध्ये पॅसिफिक बेटांच्या नेत्यांसोबतच्या बैठकीलाही ते उपस्थित राहणार आहेत. यानंतर जो बायडेन, मोदी आणि किशिदा ‘क्वाड’ गटाच्या बैठकीसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. मात्र, यानंतर बायडेन आणि मोदींच्या पुढील भेटीसाठी फार काळ थांबावे लागणार नाही. दिनांक 22 जून रोजी बायडेन मोदींच्या राज्य दौऱ्याचे आयोजन करणार आहेत.