Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

उद्यापासून फ्रान्समध्ये कान्स चित्रपट महोत्सव

जगभरातील सिनेप्रेक्षकांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय असणाऱ्या ७६ व्या ‘कान्स चित्रपट महोत्सवा’ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाचा महोत्सव फ्रान्समध्ये 16 ते 27 मे दरम्यान होणार आहे. या महोत्सवाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 16 मे पासून यंदाचा ‘कान्स चित्रपट महोत्सव” सुरू होणार आहे. 16 मे पासून सुरू होणारा हा महोत्सव 27 मे पर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवात हॉलिवूड ते बॉलिवूडपर्यंत सिनेविश्वातील अनेक मंडळी उपस्थित राहणार आहेत.

जगातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या कान्स चित्रपट महोत्सवाची सर्वांना उत्सुकता आहे. बॉलीवूड सिनेसृष्टीतील ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पदुकोण दरवर्षी या महोत्सवाला हजेरी लावत असतात. यंदा अनुष्का शर्मा आणि मानुषी छिल्लरही या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार आणि चित्रपट समीक्षकही चित्रपट महोत्सवात सहभागी होऊ शकतात. त्यासाठी त्यांना लाखो रुपये खर्च करुन तिकीट काढावे लागणार आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठीची तिकीटाची किंमत 5 लाख ते 20 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. यासाठी ड्रेस कोड ठेवला असून या ड्रेस कोडचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे सांगण्यात आले आहे. पुरुषांना डिनर जॅकेट किंवा सूट परिधान करावे लागतील. तसेच या ड्रेसवर शूजदेखील घालावे लागणार आहेत. महोत्सवाचे आयोजन फ्रान्समधील फ्रेंच रिवेरा येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात अनेक चांगल्या दर्जाचे सिनेमे दाखवले जाणार आहेत.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *