
तुर्कस्तानमध्ये रविवारी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. येथे कोणत्याही पक्षाला ५०% पेक्षा जास्त मते मिळाली नाहीत. या स्थितीत 28 मे रोजी पुन्हा निवडणुका होण्याची शक्यता आहे. भारतविरोधी रेसेप तय्यिप एर्दोगन यांच्या पक्ष ‘एपीके’ला तुर्की जनतेकडून 49.4% मते मिळाली. दुसरीकडे, केमाल केलिकदारोग्लू यांच्या पक्ष ‘सीएचपी’ ला 45 % मते मिळाली आहेत.

सध्याचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन हे काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानचे समर्थक आहेत. एर्दोगन हे 11 वर्षे तुर्कस्तानचे पंतप्रधान आणि 9 वर्षे राष्ट्राध्यक्ष आहेत. लोकशाही कमकुवत केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. दुसरीकडे केमाल केलिकदारोग्लू यांना ‘तुर्कीचे गांधी’ म्हटले जाते. त्यांना 6 विरोधी पक्षांच्या वतीने उमेदवार घोषित करण्यात आले आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तुर्कस्तानमध्ये भीषण भूकंप झाला होता. या भूकंपात 50000 लोकांना आपला जीव गमवावा लागला. या भूकंपामुळे 11 शहरांमध्ये हाहाकार उडाला आहे. त्यापैकी 8 शहरांमध्ये एर्दोगन यांना गेल्या 2 निवडणुकांमध्ये 60% पेक्षा जास्त मते मिळाली. यावर्षी कोणताही मोठा बदल नसला तरी मतांमध्ये केवळ 2 ते 3 टक्क्यांची घसरण आहे. भूकंपामुळे तुर्कस्तानमधील लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. देश बेरोजगारीकडे वाटचाल करीत आहे. यासोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. एका माध्यमाच्या हवाल्यानुसार, 28 मे पर्यंत रेसेप तय्यप एर्दोगन आपल्या मतदारांना वळवण्याचा प्रयत्न करतील.