Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

नवीन संसद भवनाचे लवकरच उद्घाटन

नवीन संसद भवनाचे बांधकाम पूर्ण झाले असून या महिन्याच्या अखेरीस म्हणजे २६ मे रोजी या नवीन वास्तूचे औपचारिक उद्घाटन होणे अपेक्षित आहे. वास्तविक, या दिवसाचा पंतप्रधान मोदींशी विशेष संबंध आहे. सन 2014 साली मोदींनी यादिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. हा दिवस संस्मरणीय बनविण्यासाठी ते २६ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करू शकतात.

नवीन संसद भवनाची इमारत अंदाजे 970 कोटी रुपये खर्चून पूर्ण झाली आहे. यामध्ये आधुनिक, हायटेक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे. जी-२० देशांच्या संसदेच्या अध्यक्षांची बैठक या वर्षाच्या अखेरीस नवीन इमारतीत होऊ शकते. भारत 2023 साठी ‘जी-20’ चा अध्यक्ष आहे. नवीन संसद भवनाचे बांधकाम 15 जानेवारी 2021 रोजी सुरू झाले. त्यानंतर 2022 मध्ये ते तयार झाले. त्याचे क्षेत्रफळ 64,500 चौरस मीटर असून ही 4 मजली इमारत आहे. यामध्ये 1,224 खासदार एकत्र बसू शकतात.

या संसद भवनाचे 3 मुख्य दरवाजे असून ते ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार आहेत. विशेष बाब म्हणजे सभागृहात खासदार, महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि पाहुण्यांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असतील. संविधान सभागृह हे याच इमारतीतील आणखी एक आकर्षण आहे, जे विशेषतः लोकशाही वारसा प्रदर्शित करण्यासाठी केलेले आहे. भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत या सभागृहात ठेवण्यात आली आहे. यात एक ग्रंथालय, अनेक समिती खोल्या आणि जेवणाच्या खोल्यादेखील आहेत.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *