Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

पालक पराठा

साहित्यः 2 वाट्या चिरलेला पालक, 1 वाटी गव्हाचे पीठ, पाव वाटी हरभरा डाळीचे पीठ, 3 – 4 हिरव्या मिरच्या, ५ – ६ पाकळ्या वाटलेला लसूण, चवीनुसार मीठ, अर्धा छोटा चमचा जिरेपूड, पराठा भाजण्यासाठी तेल.

कृती : पालक स्वच्छ धुवून घ्यावा. त्यांनंतर वाफवून घ्यावा. वाफवलेला पालक हाताने फेटून घ्यावा. त्यामध्ये गव्हाचे आणि डाळीचे पीठ मिसळावे. वाटलेली हिरवी मिरची, मीठ, वाटलेला लसूण आणि मिरेपूड घालावी. यानंतर पीठ मळून घ्यावे. पीठ भिजवताना एक चमचा तेल घालावे. हे पीठ एक तास भिजत ठेवावे. त्यानंतर पिठाचे छोटे गोळे करून चपातीप्रमाणे लाटून तव्यावर खरपूस भाजावेत. भाजत असताना कडेने तेल सोडावे. चटणीबरोबर गरम-गरम खायला द्यावेत.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *