Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी अभिनेते प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी नाट्यपरिषद नियामक मंडळाच्या कार्यकारी समितीसाठी बुधवारी निवडणूक झाली.

या निवडणुकीत ‘आपलं पॅनेल’चे प्रसाद कांबळी तर रंगकर्मी नाटक समूहाचे प्रशांत दामले यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरशीची लढत झाली. या लढतीत ६० पैकी ५० मते मिळवत प्रशांत दामले बहुमताने निवडून आले. नाट्य परिषदेच्या प्रशासन उपाध्यक्षपदावर नरेश गडेकर, उपक्रम उपाध्यक्षपदावर भाऊसाहेब भोईर, तर कार्यवाहपदावर अजित भुरे निवडून आले आहेत.

कोषाध्यक्षपदी सतिश लोटके यांची निवड झाली आहे. नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीवरही प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूह’ गटाचे वर्चस्व पहायाला मिळाले. या कार्यकारिणीत रंगकर्मी नाटक समूहाचे ११ सदस्य निवडून आले आहेत.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *