जी-२० च्या ऊर्जा संक्रमण कार्यगट बैठकीचा समारोप
‘जी-२०’ राष्ट्रसमूहाच्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाची तिसरी बैठक मुंबईत संपन्न झाली. जागतिक पातळीवर सर्व देशांना आधुनिक आणि आणि शाश्वत ऊर्जा मिळण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जावे, याबाबत या बैठकीत एकमत झाले. भारताच्या ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आलोक कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही 3 दिवसांची बैठक झाली.

ऊर्जा संक्रमणाच्या मार्गातील तांत्रिक अडथळे दूर करणे, ऊर्जा संक्रमणासाठी कमी खर्चात अर्थसहाय्य पुरवणे, ऊर्जा सुरक्षा आणि विविध स्रोतांमधून ऊर्जानिर्मिती, ऊर्जा संवर्धन, भविष्यासाठीचे इंधन आणि जगातील सर्व देशांना ऊर्जा उपलब्ध व्हावी या मुद्द्यांवर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. या बैठकीत ज्या मुद्यांबाबत अधिक चर्चा करण्यात आली.

या मुद्द्यांवर कार्यसमुहाच्या यापुढच्या चौथ्या बैठकीत अधिक चर्चा होणार आहे. ही आगामी बैठक दिनांक १९ आणि २० जुलैला गोव्यात होणार आहे. याविषयी ‘ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी’चे महासंचालक अभय बाकरे यांनी माहिती दिली.