मुंबईतील योजना लाभार्थ्यांशी जे.पी.नड्डा यांचा संवाद
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून त्यांनी मुंबईत घाटकोपर येथे केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या ३०० लाभार्थ्यांशी संवाद साधला. सरकारच्या ‘कौशल्य विकास मुद्रा’ योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले अनुभव यावेळी सांगितले.

सरकारकडून जेव्हा योग्य धोरणांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली जाते, तेव्हा लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होतो. मोदी सरकारच्या अनेक योजनांमुळे दारिद्र्य निर्मूलन झाले आहे. या योजना तळागाळापर्यंत पोहोचत असल्याचे सांगून याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. देशात जेव्हा उत्तम नेतृत्व असते तेव्हा लोकांना त्याचा लाभ होतो, असे ते म्हणाले.
आज केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी घाटकोपर, मुंबई येथे संवाद साधला.
आदरणीय पंतप्रधान @narendramodi जी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात विविध सर्वसमावेशक आणि जनकल्याणकारी योजनांची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे. यामुळे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्या… pic.twitter.com/IbviTmP154
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) May 17, 2023
महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठप्प असलेली विकासकामे आता भाजपा – सेना युतीच्या सरकारने वेगाने सुरु केली आहेत, असेही जे.पी.नड्डा यांनी सांगितले. कांदिवली येथे भाजपाच्या संमेलनात त्यांनी मार्गदर्शन केले. भाजपा हा विचारसरणीवर आधारित पक्ष असल्याने जनतेला दिलेली वचने आणि आश्वासने आपण पूर्ण करुन दाखवतो, असे ते म्हणाले. ‘सब का साथ, सब का विश्वास’ हा मंत्र घेऊन कार्यकर्त्यांनी जनतेची सेवा करावी, असे आवाहन त्यांनी केले. नड्डा यांनी चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

त्यानंतर नड्डा यांनी बोरिवली येथील अटल स्मृती उद्यानाचा दौरा केला. या उद्यानात तयार करण्यात आलेले अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनकार्यावर आधारित दृकश्राव्य प्रदर्शन आणि संसद भवनाची प्रतिकृती देखील त्यांनी पाहिली.
आज बोरीवली, मुंबई येथील अटल स्मृती उद्यानात आपल्या मार्गदर्शक 'भारत रत्न' आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित संग्रहालयाला भेट दिली.
अटलजींच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी प्रसंग आणि घटना या उद्यानाने जपल्या आहेत.
त्यांचे संपूर्ण जीवन सर्व भाजप कार्यकर्त्यांसाठी… pic.twitter.com/Af1eDCnkJj
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) May 17, 2023
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि पक्षाचे इतर नेते उपस्थित होते.