गणेश मंडळासह मूर्तीकारांना मुख्यमंत्र्यांना सूचना
कोकणातील सार्वजनिक गणेश मंडळ आणि गणेश मूर्तीकारांसोबत बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत बैठक घेतली. यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केले.

‘प्लास्टर ऑफ पॅरीस’ च्या मूर्तीतील प्रदूषणकारी घटक कमी करण्यासाठी किंवा त्याला काही पर्याय शोधण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. मुंबईतील गणेश मंडळांना आणि मूर्तीकारांना सुलभपणे जागा उपलब्ध करुन देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिकेचे प्रशासक इकबालसिंह चहल यांना केली.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीतील प्रदूषणकारी घटक कमी करणे अथवा इतर काही पर्याय उपलब्ध करण्यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची आज घोषणा केली, सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई तसेच कोकणातील मूर्तिकार, सार्वजनिक गणेश मंडळांच्या… pic.twitter.com/3fdu5PB1Hm
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 17, 2023
गणेश मंडळानी उत्सव साजरा करताना निसर्गाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. अलिकडे पर्यावरणपूरक मूर्तींना पसंती मिळत आहे. त्यामुळे त्या दृष्टीकोनातून पर्याय उपलब्ध करावेत, असे शिंदे यांनी सांगितले.

या बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि सचिव उपस्थित होते.