रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील
जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. नव्या पिढीने काळाची पावले ओळखून परंपरागत शिक्षणाबरोबर नाविन्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे, असे भाष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंबई येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबीर मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. मागणी आणि पुरवठा यामध्ये असलेल्या फरकामुळे कौशल्य विकासाची आवश्यकता अधिक आहे. त्यासोबत नवनिर्मिती करणे आणि भविष्यासाठी तयार असणे अत्यंत आवश्यक आहे.

त्यासाठी राज्य सरकार उत्तम काम करीत आहे, असे जे. पी. नड्डा यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी कार्यपद्धतीमुळे कौशल्य विकास योजनेअंतर्गत शासन कौशल्य विकासाला आणि ‘स्टार्ट अप्स’ना प्रोत्साहन देत आहे, असेही त्यांनी सांगितले.